शिवतीर्थ ढोल ताशा वाद्य पथक

आम्ही सांगलीकरआमच्याविषयी


  सांगली नगरीचे आराध्य दैवत श्रीगणरायाच्या शुभ आशीर्वादाने शिवतीर्थ ढोल ताशा वाद्य पथकाला यशस्वी ६ वर्षे पूर्ण झाली.

  पथकाच्या उभारणीसाठी आमच्या पथकातील प्रथम सभासदांनी अथक परिश्रम घेतले आहेत. व त्या परिश्रमाचे फळ म्हणजेच तुम्ही आमच्या वादनास दिलेले उत्स्फूर्त प्रोत्साहन व पाठीवर मारलेली कौतुकाची थाप...या मुळे आमचे जीवन धन्य झाले आहे.एका कलाकाराला त्याच्या कलेची योग्य दाद मिळण्यासारखा आनंद दूसरा कशातही नाही.

  डी.जे. सारख्या जीव घेण्या स्पीकर्समुळे अनेक वयोवृद्ध व लहान मुलांना भरपूर त्रास सहन करावा लागतो. काहींचे तर त्यात प्राणही जातात. मग अशा प्रकारचे स्पीकर्स हवेतच कशाला...? आजच्या तरुण पिढीला मोठमोठे स्पीकर्स,लाईट्स,दारु पिउन,मद्यपान करून नाचणे ह्यातच खुप मोठे पणा वाटतो.आणि ह्या मुळेच आजच्या तरुण पीढीवर वाईट संस्कार होत आहेत.

  ह्या सर्व वाईट गोष्टी थांबविण्या करीता त्यांना चांगली शिस्त,चांगले संस्कार देण्याकरीता तसेच आपल्या सांस्कृतिक व पारंपारीक वाद्यांची कला व महत्व इत्यादी गोष्टी सर्व तरुण वर्गासमोर आणन्या करीता शिवतीर्थ ढोल ताशा वाद्य पथकाची स्थापना २४ मे २०१३ रोजी करण्यात आली.

  कलाकारांची नगरी म्हणून ओळख असणार्या सांगली नगरीतील रसिकश्रोत्यांनी पथकातील तरुण व तरुणीनी त्यांच्या सळसळत्या रक्तातल्या सामान्य गुणांना असामान्य बळ दिल्यामुळे पथकातील वाद्कांची संख्या झपाट्याने वाढत गेली.

  आमच्या पथकामध्ये आम्ही सर्व वादक एक परिवारा प्रमाणे आहोत.पथकातील वातावरण परीवारा सारखे असल्यामुळे एखादा नविन वादक लगेच आमच्या परिवराचा हिस्सा होउन जातो.पथकातील प्रत्येक वादक आपल्या वाद्यांची योग्य ती काळजी घेतो.


पथकातील वैशिष्ट


  अगदी लहान लहान मुलांना सुद्धा आपली कला सादर करण्याची संधी दिली जाते.आमच्या पथकामध्ये बेसिक हात वाजविण्या पेक्षाही अवर्तनाना जास्तीत जास्त महत्व दिले जाते.अवर्तानां मधून आमचे वेगळेपण दिसून येते.आवर्तन ऐकून रसिकश्रोते मंत्रमुग्ध होउन जातात.वादनातील वेगळेपण जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न अखंड सुरु असतो.

  शिवतीर्थ चा प्रचंड समृद्ध व परिपक्व असा हा परिवार चांगल्या विचारांची निर्मळ रोपे लावून ती जपण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे.

  आम्ही आमच्या कलेच्या जोरावर नवनविन ताल,ठेके,नाविन्यपूर्ण वादनाचे प्रकार आपल्या भेटीस आणले आहेत व असेच आणत राहू.

  ग्रामदैवत श्रीगणरायाच्या शुभ आशीर्वादाने आम्ही शिवतीर्थ ढोल ताशा पथकाचा प्रवास असाच अखंड एकजुटीने चालू ठेवू.

  आमचे सर्वस्व आणि अनमोल संपत्ती:ढोल-ताशा,टोल,ध्वज,शंख,टिपरू,डफ,हलगी,वादक इत्यादी.

ताल वाद्यांचा..

नाद संस्कृतीचा..!


सांगली नगरीचे आराध्य दैवत श्री गणेशऐतिहासिक श्री गणेश मंदीर

  मुख्य मंदीर काळ्या पाषाणातील असून पेशवेकालीन वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून याकडे पाहिले जाते.

  चिंतामणराव पटवर्धनांनी कृष्णा नदीकाठी १८१४ मध्ये गणेश मंदीराची उभारणी सुरू केली. ती पुढे तीस वर्षे सुरू होती, असे सांगितले जाते.

  कृष्णातीरावरील गणेश मंदीर तब्बल दोन शतके सांगलीकरांच्या सुख-दु:खाचा साक्षीदार बनून राहिले आहे. या संस्थानकालीन मंदीराचे सौंदर्य लुभावणारे आहे. दगडी स्थापत्याचा उत्कृष्ट नमुना म्हणून अभ्यासकांना आकर्षित करणारे हे मंदीर वैशिष्टपूर्ण रचनेमुळे ख्यातकीर्त झाले नसते तर नवलच.

  प्रवेशद्वाराला लाल दगड वापरला तर मुख्य गाभारा आणि पंचायतनच्या मंदीरासाठी काळा घडीव दगड वापरला. शेकडो मजूर रात्रंदिवस या मंदीराच्या उभारणीच्या कामासाठी कष्ट करीत होते. वेगळ्या धाटणीच्या या मंदिराचे काम पूर्ण झाल्यानंतर १८४५ मध्ये चैत्र शुद्ध दशमीला या मंदीराचा अर्चा विधी झाला.

  मंदीरातील पंचायतनच्या पाच मूर्ती भिमण्णा आणि मुकुंदा पाथरवट या स्थानिक कारागिरांकडून बनवून घेण्यात आल्या. यानंतर दोन वर्षांनी म्हणजे १८४७ मध्ये मंदिराच्या शिखराचे काम पूर्ण करण्यात आले. १८४७ मधील मार्गशीर्ष महिन्यात मंदीराचा कलशारोहण समारंभ मोठय़ा थाटामाटात साजरा करण्यात आला

  मंदीरात संगमरवरातील रिद्धी-सिद्धीसह असलेल्या गणेशाची मूर्ती सुबक आहे. मुख्य मंदीराभोवती चिंतामणेश्वर हे महादेवाचे, चिंतामणेश्वरी हे देवीचे, सूर्यनारायण आणि लक्ष्मीनारायण अशी चार मंदीरे आहेत. या चार व एक मुख्य मंदीरे असे गणपती पंचायतन म्हणून ओळखले जाते.